मुख्य सामग्रीवर वगळा

प्रिंटर

प्रिंटर

मोँनिटरच्या स्क्रीन वर जी माहिती मिळते त्यास आउटपुट असे म्हणतात .हा आउटपुट संगणक बंद केला की दिसेनासा होतो . स्क्रीन वर , हार्ड डिस्क , फ्लोपी डिस्क वर मिळणाऱ्या माहिती मध्ये पाहिजे तेव्हा बदल करता येतो म्हणुन अशा माहितीला सॉफ्ट कॉपी असे म्हणतात . संगणका मधून अशी माहिती प्रिंटर या प्रदान म्हणजेच आउटपुट डिवाइस मधून कागदावर छापता येते . प्रिंटर ने छापलेली माहिती तशीच राहते म्हणुन त्या माहितीला हार्ड कॉपी असे म्हणतात. प्रिंटर हे परेलाल किवा यूएसबी केबल द्वारे CPU मध्ये मदर बोर्ड ला जोडले जाते . 

प्रिंटर चे सध्या ३ भाग प्रचलित आहेत .

1) डॉट मेट्रिक्स प्रिंटर :- 
ह्या प्रिंटर मधी अक्षरे अनेक टिम्बाच्या स्वरूपात छापली जातात. गोल बारीक़ पिन्सची एक किवा दोन लाइनची मालीका असते . प्रतेक पिन स्वतन्त्र पणे शाईच्या रिबिन्वर आघात करते . त्या मुळे रिबिन्वारिल शाईचा ठपका कागदावर उमटतो . संगणकाच्या संदेशा प्रमाने पिन्स रिबिन वर जलद गतीने आघात करतात त्या मुळे कागदावर टीबाच्या स्वरूपात अक्षरे उमटतात . 
डॉट मेट्रिक्स प्रिंटर हे कमी खर्चाचे असतात . पण प्रिंटिंगच्या वेळी खुप मोठा आवाज करत प्रिंटिंग करतात . बँकेच्या ठिकाणी अशाच प्रकारचे प्रिंटर वापरले जातात

२) इंक जेट प्रिंटर :-

हे प्रिंटर शाईच्या तुषार जल्द गतीने फवार्य सारखे उडतात .इंकच्या तुषार सूक्ष्म छिद्रांच्या नॉझल्सने कागदावर उडवले जातात .यात नोझल्सच्या मदतीने योग्य प्रमाणात चार प्राथमिक रंग मिसळुन रंगित प्रिंट करता येते .
३) लेझर प्रिंटर :-
हे प्रिंटर छापाईसाठी लेझर किरणांचा वापर करतात. संगणका कडून येणार्या माहिती नुसार हे लेझर किरण सतत गोल फिरणारया ड्रमवर पडली जाते . या लेझर किरण मुळे ड्रमवर स्थिर विद्युत प्रभाराचे ठिपके तयार होतात . ड्रमच्या लगत असलेली कोरडी शाईची भुकटी (टोनर) ड्रम वरील विद्युत् प्रभारित कागदावर मचकुराच्या ओळी किवा चित्राचे भाग तयार होतात .
सध्या ओल इन वन (All In One ) प्रिंटरला जास्त मागणी आहे कारण हयात सर्व प्रकारचे Function आहेत . झेरोक्स , स्कैनर , प्रिंटर , फैक्स अशा सर्व गोष्टी एकात मिळतात ह्या मुळे अशा प्रिंटरला जास्त डिमांड आहे .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संगणक चालू/बंद कसा करावा ?

संगणक चालू/बंद कसा करावा ? संगणक सुरु करण्यासाठी प्रथम त्याचे पॉवर सप्लाई बटन सुरु  करावे.   नतर  CPU मधील बटन प्रेस करावे जेन्हे  करून  CPU सुरु  होइल.  CPU सुरु झाला की  नाही  हे ON/OFF बटनाच्या बाजुच्याला असणार्या लाईट वरून समजते . संगणकाचा विद्युत् पुरवठा बंद करण्या पूर्वी आपला संगणका एक विशिष्ट प्रक्रियेने बंद करावा लागतो. त्या प्रक्रियेस Shut Down असे म्हणतात. विन्डोज़ वापरताना शट डाउन प्रक्रिया न करता संगणक बंद केल्यास विन्डोज़ मधल्या अनेक फाइल डिलीट होण्याची शक्यता असते. म्हणुन विन्डोज़ वापरताना शट डाउन प्रक्रिया करणे गरजेच आहे . संगणक शट डाउन करण्यासाठी ? १) टास्क बार वरील स्टार्ट (Start) या बटनावर क्लिक करावे . २) स्टार्ट (Start) मेनू मधील शट डाउन (Shut Down ) या आप्शन वर क्लिक करावे . ३) स्क्रीन वर Shut Down ची विन्डोज़ दिसेल । शट डाउन (Shut Down ) या विन्डोज़ मध्ये चार पर्याय  असतात. १) स्टैंड  बाय  (Stand By) :- संगणक पूर्ण बंद न करता थाबायाचे असेल तर स्टैंड बाय या पर्ययाचा उपयोग होतो या कमांड मुळे ...

संगणकाचे फायदे आणि उपयोग

संगणकाचे फायदे आणि उपयोग संगणक हे आज विविध क्षेत्रा मध्ये विविध प्रकारच्या व्यक्ति समुहाद्व्यारे आणि विविध कार्यासाठी वापरले जाणारे यंत्र आहे . एकविसाव्या शतकात संगणकाने मानवाच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणले आहेत . संगणकाच्या सर्व प्रकारच्या उपयोगात येणार्या गोष्टींची नोंद करणे अशक्य आहे . आपण अगदी महत्वाच्या उपयोगावर दृष्टिषेप टाकुया . १) वेग :-  कोणते ही काम असले तरी ते वेगाने पार पडावे अशी प्रत्येकाची अपेक्षा असते . संगणक कोणते ही काम सेकंदांच्या भागात करू शकतो अत्यन्त वेगाने करू शकतो आणि बिनचुक करू शकतो हा त्याचा सर्वात मोठा फायदा आहे . २) अथकपणा :-  आपणकिती ही कार्यक्षम असलो तरीही तेच ते काम करण्यास कंटाळा  येवू शकतो . संगणक हे एक यंत्र असल्याने त्याला एकाच प्रकारचे काम करण्यास कंटाळा येत नाही .  ३) स्वयंचलित :-  संगणकाला कोणते ही काम करण्यासाठी योग्य फोड़ करुण दिल्यास योग्य सूचना आणि काम कोणाच्याही मदती शिवाय किवा देख्ररेखी शिवाय पार पडतो . ४) तार्किक व अमृत प्रक्रिया :-  गणिती प्रक्रिया बरोबर संगणक तार्किक व अमृत प्रक्रिया करू शक...
मदर बोर्ड (Motherboard) मदर बोर्ड (Motherboard) हे संगणकाचे ह्रदय आहे . याला सिस्टमचा मेनबोर्ड असे ही  म्हणतात.  संगणका मधले सर्व डिव्हाईस एकत्र आणण्याचे काम मदर बोर्ड  करतो.  मदर बोर्ड वरील कॉम्पोनेन्ट आपला संगणकाचा प्रकार त्याची कार्यक्षमता , मर्यादा ठरवतो मदरबोर्ड को - प्रोसेसर , बायोस , मेमरी तसेच अनेक स्लोट  असतात.  मदर बोर्डसर्व कार्ड ला सपोर्ट करतो उदा. टीवी टुनेरकार्ड , साउंडकार्ड , डिस्प्ले कार्ड . मदर बोर्ड विकत घेताना जास्तीत जास्त प्रकारच्या इंटरफेस आणि स्टैण्डर्ड कंट्रोल्स असलेला घेण चागले  असते.  मदर बोर्ड मध्ये मेमरी चिप्स स्पेशल वेगळा सेट असतो जो मेमरी पेक्षा वेगळा असतो व प्रोग्राम सुरु होण्यासाठी उपयोगी पडतो या अतिरिक्त मेमरीला बोंयस् असे  म्हणतात.  मदर बोर्ड हा CPU मध्ये जोडलेला असतो त्याला SMPS च्या सहाय्याने व्होल्टेज दिले जाते याच मदर बोर्डवरुन प्रोसेसर ही जोडलेला असतो . ATX आणि AT असे दोन भाग या मदर बोर्डचे  आहेत ATX मदर बोर्ड  सध्याच्या कॉम्प्युटर  मध्ये वापरले जातात ...