मुख्य सामग्रीवर वगळा

की-बोर्ड (Keyboard)

की-बोर्ड (Keyboard)

की-बोर्ड (Keyboard):-

की-बोर्ड हे संगणकाचे इनपुट डिवाइस आहे . की-बोर्ड च्या सहाय्याने आपणास संगणकाशी सव्वाद साधणे शक्य होते. संगणकाला माहिती देण्यासाठी किवा विशिष्ठ सूचना देण्यासाठी की-बोर्ड चा वापर होतो . की-बोर्ड सामान्यत टाइप रायटर सारखा असतो . जशी की आपण की-बोर्ड वर टाइप करतो तशीच अक्षरे स्क्रीन वर येतात . की-बोर्ड मध्ये काही बटन विशिष्ठ चिन्ह काढण्यासाठी असतात .

की बोर्ड चे साधारण खालील चार भाग पडतात . 
१) फक्शनल की पेड़ २) अल्फा न्युमरिकल की पेड़ ३) न्युमरिकल की पेड़ ४) कर्सर की पेड़ 

१) फक्शनल की पेड़ :- या मध्ये F1 ते F2 अशा फक्शनल कीज असतात . ह्या सर्व विशिष्ट कामा साठीच वापरतात .
२) अल्फा न्युमरिकल की पेड़ :- या मध्ये A ते Z ही इंग्लिश मुळक्षरे असतात . एकूण २६ आणि ० ते ९ असे अंक असतात .
३) न्युमरिकल की पेड़ :- यात ० ते ९ असे अंक असतात आणि काही विशिष्ठ कीज काही विशिष्ठ कामा साठीच वापरतात .
४) कर्सर की पेड़ :- लेफ्ट, राइट, डाउन , अप ह्या जागेवर जायचे असल्यास ह्या कीज चा उपयोग केला जातो .
की बोर्ड वर कमीत कमी ८३ तर १२७ बटन असतात . सर्व साधारण की बोर्ड वर ११० कीज असतात . ज्या की बोर्ड वर ११० कीज पेक्षा जास्त कीज असतात त्याला मल्टीमीडिया की-बोर्ड म्हणतात .
की-बोर्ड CPU च्या मागील भागाला जोडले असते . की-बोर्ड नोर्मल, पीस/२ , युसबी तसेच वायरलेस पोअर्ट मध्ये उपलब्ध आहेत .
विन्डोज़ XP मध्ये स्टार्ट मेनू वर क्लिक करून Run या आप्शन वर OSK टाइप करून ENTER बटन दाबल्या नतर एका विंडोवर एक कीबोर्ड येइल यावर माउस ने क्लिक केल्यास तेच के टाइप होतील ज्यावर आपण क्लिक करू .असा कीबोर्ड ज्या वेळेस आपला कीबोर्ड चालत नसेल काही कही कीज काम करत नसतील तेव्हा ऑन स्क्रीन कीबोर्ड कामाला येतो.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संगणक चालू/बंद कसा करावा ?

संगणक चालू/बंद कसा करावा ? संगणक सुरु करण्यासाठी प्रथम त्याचे पॉवर सप्लाई बटन सुरु  करावे.   नतर  CPU मधील बटन प्रेस करावे जेन्हे  करून  CPU सुरु  होइल.  CPU सुरु झाला की  नाही  हे ON/OFF बटनाच्या बाजुच्याला असणार्या लाईट वरून समजते . संगणकाचा विद्युत् पुरवठा बंद करण्या पूर्वी आपला संगणका एक विशिष्ट प्रक्रियेने बंद करावा लागतो. त्या प्रक्रियेस Shut Down असे म्हणतात. विन्डोज़ वापरताना शट डाउन प्रक्रिया न करता संगणक बंद केल्यास विन्डोज़ मधल्या अनेक फाइल डिलीट होण्याची शक्यता असते. म्हणुन विन्डोज़ वापरताना शट डाउन प्रक्रिया करणे गरजेच आहे . संगणक शट डाउन करण्यासाठी ? १) टास्क बार वरील स्टार्ट (Start) या बटनावर क्लिक करावे . २) स्टार्ट (Start) मेनू मधील शट डाउन (Shut Down ) या आप्शन वर क्लिक करावे . ३) स्क्रीन वर Shut Down ची विन्डोज़ दिसेल । शट डाउन (Shut Down ) या विन्डोज़ मध्ये चार पर्याय  असतात. १) स्टैंड  बाय  (Stand By) :- संगणक पूर्ण बंद न करता थाबायाचे असेल तर स्टैंड बाय या पर्ययाचा उपयोग होतो या कमांड मुळे ...

संगणकाचे फायदे आणि उपयोग

संगणकाचे फायदे आणि उपयोग संगणक हे आज विविध क्षेत्रा मध्ये विविध प्रकारच्या व्यक्ति समुहाद्व्यारे आणि विविध कार्यासाठी वापरले जाणारे यंत्र आहे . एकविसाव्या शतकात संगणकाने मानवाच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणले आहेत . संगणकाच्या सर्व प्रकारच्या उपयोगात येणार्या गोष्टींची नोंद करणे अशक्य आहे . आपण अगदी महत्वाच्या उपयोगावर दृष्टिषेप टाकुया . १) वेग :-  कोणते ही काम असले तरी ते वेगाने पार पडावे अशी प्रत्येकाची अपेक्षा असते . संगणक कोणते ही काम सेकंदांच्या भागात करू शकतो अत्यन्त वेगाने करू शकतो आणि बिनचुक करू शकतो हा त्याचा सर्वात मोठा फायदा आहे . २) अथकपणा :-  आपणकिती ही कार्यक्षम असलो तरीही तेच ते काम करण्यास कंटाळा  येवू शकतो . संगणक हे एक यंत्र असल्याने त्याला एकाच प्रकारचे काम करण्यास कंटाळा येत नाही .  ३) स्वयंचलित :-  संगणकाला कोणते ही काम करण्यासाठी योग्य फोड़ करुण दिल्यास योग्य सूचना आणि काम कोणाच्याही मदती शिवाय किवा देख्ररेखी शिवाय पार पडतो . ४) तार्किक व अमृत प्रक्रिया :-  गणिती प्रक्रिया बरोबर संगणक तार्किक व अमृत प्रक्रिया करू शक...

मॉनिटर (Monitor)

मॉनिटर (Monitor) की -बोर्डच्या मदतीने संगणकाला दिलेली माहिती ज्या दूरदर्शन संचासारख्या दिसणारया पडद्या वर उमटते त्याला "मॉनिटर" असे म्हणतात . मॉनिटर म्हणजे व्हिजुअल डीस्प्ले यूनिट असे म्हणतात किवा व्ही .डी .यु . असे ही म्हणतात . मॉनिटर संगणकाचे आउट पुट डिव्हाईस असे म्हणतात . मॉनिटरला संगणकाचे आउट पुट डीव्हाईस असे म्हणतात . मॉनिटरचा आकार : मॉनिटरचा आकाराचे मोजमाप त्याच्या पडद्याच्या म्हणजेच स्क्रीनच्या कर्नाच्या लांबी मध्ये केले जाते . सामान्यत बाजारात १५" , १७" , १९", २१" अश्या स्वरुपाचे मॉनिटर उपलब्ध आहेत . फ्लाट्स स्क्रीन चे मॉनिटर हल्ली जास्त प्रमाणात विकले जातात .  जेवढा आकार मोठा तेवढी त्याची किंमत जास्त असते . मॉनिटरचे प्रकार :- इलेक्ट्रानिक्स क्षेत्रातील प्रगती मुळे विविध प्रकारचे मॉनिटर उपलब्ध झाले आहेत . मॉनिटर आकाराच्या आणि तंत्राच्या बाबती मध्ये टेलीविजन सारखेच असतात . मॉनिटर हे कैथोड रे ट्यूब पासून बनले आहेत म्हणुन त्याना CRT ( कैथोड रे ट्यूब ) असे म्हणतात . CRT चा आकार मोठा असल्याने छोट्या आणि सूट सुटीत आकाराच्या ...